बदलापूर येथे ग्राहक/सभासद मेळावा

    
|
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या बदलापूर [कुळगांव] आणि बदलापूर [प.] शाखेचा सभासद/ग्राहक मेळावा शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सांयकाळी ६.३० वाजता बदलापूर [पूर्व] येथील काटदरे मंगल कार्यालय येथे होणार आहे. डोंबिवली बँक बदलापूर शहरात गेली सुमारे ४० वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सदर कार्यक्रमासाठी बँकेचे मा. संचालक व व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यास सभासद व ग्राहकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.