डोंबिवली बँकेचा अनुदान व पुरस्कार वितरण सोहळा.

    
                     
Dharmaday _1  H                                                
                                                                           डोंबिवली बँकेचा अनुदान व पुरस्कार वितरण सोहळा.
डोंबिवली नागरी सहकारी बँक, प्रतिवर्षी आपल्या निव्वळ नफ्यातून १% रक्कम सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकिय, ग्रामिण, वाचनालय इ. क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांना अनुदान स्वरूपात धर्मादाय निधी म्हणून वितरीत करत असते. ह्यावर्षी १०३ संस्थांना सुमारे ₹ २२ लाखांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील संस्थांचा समावेश आहेे.
त्याचप्रमाणे वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थेस अथवा व्यक्तीस समाजमित्र या पुरस्काराने गौरवण्यात येते. बँकेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने ह्या वर्षी ५ संस्थांना समाजमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगांना स्पर्धा परिक्षेत यश मिळावे म्हणून नि:शुल्क प्रशिक्षण देणारी जळगांव येथील दीपस्तंभ फाउंडेशन, महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली पेण येथील अहिल्या महिला मंडळ, गतिमंद-मतिमंद तसेच विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या ठाणे येथील विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट, भांडूप येथील उमंग चाईल्ड केअर व पुणे येथील डॉ शांता वैद्य मेमोरिअल फाउंडेशन या संस्थांचा समावेश आहे.
सहकार क्षेत्रात बँक कार्यरत असल्याने सहकार क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-या संस्थेस अथवा व्यक्तीस सहकार मित्र पुरस्काराने गौरवण्यात येते. धारावी सारख्या परिसरामध्ये १९८७ पासून कार्यरत असलेल्या धारावी सहकारी पतपेढी या संस्थेस या वर्षीचा सहकार मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शनिवार दि. २९ फेब्रुवारी, २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुयोग मंगल कार्यालयात योजलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांताचे मा. संघचालक डॉ. सतीशजी मोढ प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरीकांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन मा. अध्यक्ष उदय कर्वे व सरव्यवस्थापक परांजपे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.