डोंबिवली बॅंकेची सुवर्ण महोत्सवी वार्षिक सभा यशस्वीरित्या संपन्न

    
|

डोंबिवली बॅंकेची सुवर्ण महोत्सवी वार्षिक सभा यशस्वीरित्या संपन्न


डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेची ५० वी, सुवर्ण महोत्सवी वार्षिक सभा नुकतीच, रविवार दि. १४ फेब्रुवारी,२०२१ रोजी सावित्रीबाई फुले कलामंदीर, डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न झाली. कोरोनासंबंधातील सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेऊन योजलेल्या या सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. या आर्थिक वर्षात अशा प्रकारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत वार्षिक सभा घेणारी डोंबिवली बॅंक ही बहुधा पहिलीच बॅंक आहे.


मा. अध्यक्ष सी.. श्री. उदय कर्वे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात बॅंकेच्या कामगिरीबाबत तपशीलवार विवेचन केले बॅंकेचा नफा वृद्धिंगत असल्याचे नमूद केले. मा. अध्यक्ष अन्य सर्व मा. संचालकांनी सभेतील सर्व ठरावांच्या विषयांसंबंधात क्रमाक्रमाने माहिती दिली विविध ठराव सभेपुढे मांडले. सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात झाले. अन्य काही बॅंकांप्रमाणे डोंबिवली बॅंकेसही एका तांत्रिक कारणामुळे मागील वर्षी दंड आकारणी झाली होती. परंतु सदर आकारणी ही तीन वर्षांपूर्वीच्या कालावधी संबंधातील होती आणि बॅंकेचे संचालक, अधिकारी कर्मचारी या सर्वांनी पूर्णतः स्वेच्छेने सदर दंडाएवढ्या एकत्रित रकमेचे योगदान दिले सदर दंडाचा कुठलाही भार बॅंकेच्या नफ्यावर येऊ दिला नाही अशी उल्लेखनीय माहिती या सभेत देण्यात आली. सदर बाब खरोखरच अपवादात्मक आहे असे नमूद करत उपस्थित सभासदांनी याबाबत समाधान व्यक्त केले.


बॅंकेचे मा. सरव्यवस्थापक श्री. गोपाळ परांजपे यांनी चालू वर्षातही बॅंकेची नफाक्षमता उत्तम असल्याचे गेल्या दहा महिन्यांतील कामगिरीवरुन जाणवत असल्याबाबतचे तपशीलवार विवेचन केले. कोरोनाच्या काळात म्हणजेच, २०-२१ या चालू आर्थिक वर्षातही बॅंकेने निर्लेखित कर्जातून रू. २९/- कोटी इतकी उत्तम वसूली केली आहे. रोखेविक्रीतून रू. ४०/- कोटी इतके चांगले नफार्जन केले आहे व बॅंकेची भांडवल पर्याप्तताही १३.३१% इतकी समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.


कोरोना काळात बॅंकेने राबवलेल्या खर्च बचतीच्या अनेक योजनांना आलेले भरीव यश, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने बॅंकेने केलेली मदत, तसेच बॅंकेच्या विविध उपक्रमांबद्दल सभासदांनी मनापासून समाधान व्यक्त केले त्यांचेकडून बॅंकेचे संचालक अधिकारी कर्मचारी यांच्या अभिनंदनाचा ठरावही पारीत करण्यात आला.

0-0-0-0-0

 

Golden Jubilee AGM _1&nbs