नुकत्याच झालेल्या बालदिनानिमित्त डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नांदिवली शाखेतर्फे एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांनी बँकेला भेट दिली आणि बँकेच्या विविध बचत आणि गुंतवणूक योजना विशेषतः बालकांसाठी असणाऱ्या योजनांविषयी विस्ताराने जाणून घेतले. तसेच यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने बँकेत खाते चालू करून बचतीची सवय लावणे कसे आवश्यक आहे हे बँकेतर्फे सांगण्यात आले.