लघु उद्योजक मेळाव्यात DNS बँकेचा स्टॉल
'मुंबई व्यापारी असोसिएशन'तर्फे लघु उद्योजक मार्गदर्शनपर मेळावा [Small Scale Business Franchise Mela 2019] आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा उद्या ३० नोव्हेंबर रोजी होणार असून यावेळी डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या स्टॉलला ग्राहकांना भेट देता येईल व बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती घेता येईल. हा मेळावा मुंबई मराठी पत्रकार संघ, महापालिका मार्ग, सीएसटी स्टेशन जवळ सकाळी १० ते सांयकाळी ६ या कालावधीत होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: डोंबिवली नागरी सहकारी बँक , फोर्ट शाखा ०२२-२२६७९१३१/२२६७९४१४ /७०४५३४८१०२