डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या दापोली शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. डोंबिवली बँक दापोली शहरात गेली सुमारे २ वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे साहेबांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले.
बँकेच्या सभासद व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यात बँकेचे मा. संचालक आरोलकर साहेब यांनी भागधारक कल्याण निधी विषयी माहिती उपस्थितांना दिली.
तसेच बँकेचे मा. संचालक शेलार साहेब यांनी बँकेच्या स्थापनेविषयी तसेच बँकेविषयी सविस्तर माहिती दिली तर सहा.सरव्यवस्थापक पेडणेकर यांनी बँकेच्या विविध योजनांविषयी माहिती उपस्थित ग्राहकांना दिली.
त्याचप्रमाणे ग्राहकांशी संवाद साधताना उपस्थित ग्राहकांच्या शंकांचे निरसन मा. संचालकांनी केले. याप्रसंगी दापोली शाखा व्यवस्थापक अभिजीत खाडिलकर उपस्थित होते.