डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या बदलापूरमध्ये दोन शाखा आहेत. या दोन शाखांमधील सभासद व ग्राहकांचा मेळावा शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी संप्पन्न झाला.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मा. संचालक श्री. महेश फणसे यांनी केले. बँकेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, बँकेचा विस्तार, बँकेची सामाजिक बांधिलकी, संचालकांचे योगदान याबाबत माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.
बँकेचे मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती सांगितली. सद्य स्थितीतील मंदीचे वातावरण, रिझर्व्ह बँकेचे धोरण, सहकारी बँकींग क्षेत्राकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन याबद्दल सविस्तर विवेचन त्यांनी केले. त्याचप्रमाणे बँकेच्या व्यवसाय वृध्दीत चांगले कर्जदार मिळवून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती बँकेचे उपसरव्यवस्थापक श्री. राजेश शेटे यांनी दिली. तसेच बँकेच्या भागधारक कल्याण निधीची व त्याच्या विविध उपक्रमांबाबत मा. संचालक श्री. मिलिंद आरोलकर यांनी माहिती दिली.
सर्वश्री दादासाहेब पाटील, दलाल, सिंग, कर्नावट, संजय जाधव, शंकर भोईर, चव्हाण इ. ग्राहकांनी उपयुक्त सूचना केल्या तसेच आपले अनुभव सांगितले. या मेळाव्यास बदलापूर मध़ील दोन्ही शाखांचे मा. पालक संचालक श्री. जितेंद्र पटेल, श्री. मिलिंद कोपरकर तसेच कुळगांव शाखेचे व्यवस्थापक श्री. कोकरे व बदलापूर पश्चिम शाखेच्या शाखाव्यवस्थापक सौ. सई मोरे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
मेळाव्याचे सूत्रसंचालन उदय पेंडसे यांनी केले. मेळाव्यास दोन्ही शाखांचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.