डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या महिला मेळाव्यास महिला शाहीर विनता जोशी यांचे सादरीकरण
डोंबिवली नागरी सहकारी बँकेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त पुणे येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध महिला शाहीर माननीय सौ.विनता जोशी यांचा ऐतिहासिक घटनांवर आधारित कार्यक्रम सादर झाला. या मेळाव्यात, कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या सौ. कांदळगावकर तसेच बँकेच्या काही महिला ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. चैतन्याने भारावून टाकणाऱ्या या लोकप्रिय कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.