महाराष्ट्र अर्बन को. ऑप.बँक्स फेडरेशनचा आर्थिक वर्ष 2022-23 चा ` 5,000/- कोटींपर्यंत ठेवी असलेल्या गटातून डोंबिवली नागरी सहकारी बँकेस सर्वोत्कृष्ट बँक हा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्काराचे वितरण 30 सप्टेंबर, 2023 रोजी फेडरेशनचे मा. अध्यक्ष सी.ए.श्री. अजयकुमार ब्रम्हेचा यांच्या हस्ते झाले.
बँकेच्या आज रोजी 64 शाखा कार्यरत आहेत. मार्च 2023 अखेर बँकेच्या एकूण ठेवी `3756 कोटी असून कर्ज व्यवहार ` 2076 कोटींपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये बँकेला ` 117.23 कोटी ढोबळ नफा झाला असून सर्व खर्च वजा जाता ` 22.72 कोटी निव्वळ नफा झाला आहे.
बँक नेहमीच ग्राहकांसाठी किफायतशीर व्याजदराच्या कर्ज योजना व अधिक व्याजदराच्या ठेव योजना कार्यान्वित करीत असते. सणासुदीचे औचित्य साधून बँकेने नोव्हेंबर, 2023 पर्यंत वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले असून ग्राहकांना वाहनाच्या रक्कमेवर 100 टक्के कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच इलेक्ट्रीक गाडीसाठी देखील 100 टक्के वाहन कर्ज ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. बँकेने वक्रतुंड ठेव योजना कार्यान्वित केली असून 21 महिन्यांकरीता ज्येष्ठ नागरिकांना 7.80% तर सर्वसाधारण नागरिकांना 7.30% व्याजदर देण्यात येणार आहे.