बुधवार दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या ६६ व्या शाखेचे उद्घाटन वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. सी एन एस फर्स्ट चे अध्यक्ष, मा. श्री मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांत मा.संघचालक श्री अनिल भालेराव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उदघाटनप्रसंगी बोलताना श्री मुकुंद कुलकर्णी यांनी बॅंकेला शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्रातील अग्रणी, प्रगत अशा डोंबिवली बॅंकेने ग्राहकांना आर्थिक बाबतीत तसेच सायबर साक्षर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. लघु उद्योजकांना बॅंकेने सुलभ रीतीने कर्ज उपलब्ध करावे असे सुचविले.
श्री.भालेराव यांनीही बँकेच्या नवीन शाखेसाठी शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. बँकेचे मार्गक्रमण अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. वाळूज शाखा देखील अत्याधुनिक सोयी सुविधांसह सुसज्ज असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
बँकेच्या विभागीय प्रमुख सौ. वैशाली टोकरे यांनी बँकेच्या विविध योजनांबाबत उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेचे मा.संचालक श्री योगेश वाळुंजकर यांनी बँकेची स्थापना, उद्देश आणि आजवरची प्रगती याची माहिती दिली.
उदघाटन प्रसंगी, बँकेचे मा. संचालक श्री लक्ष्मण खरपडे, सीईओ श्री रमेश सिंग, मुख्य कर्ज अधिकारी श्री पराग नवरे, मुख्य व्यवसाय अधिकारी श्री अभय वाळिंबे उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.