शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या ६५ व्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. पुण्यातील ही पाचवी शाखा असेल. आंबेगाव शाखेच्या उदघाटन कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे संचालक माननीय श्री सतीश मराठे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत पुण्यातील आघाडीच्या उद्योजिका, मे. बेलराईझ इंडस्ट्रिज च्या कार्यकारी संचालिका श्रीमती सुप्रिया बडवे यांच्या शुभहस्ते शाखा उदघाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रांसगी बोलताना सौ सुप्रिया बडवे म्हणाल्या "को ऑपरेटिव्ह बँका या भारताच्या आर्थिक प्रगतीचा कणा आहेत. भारताची इकोनॉमि पाच ट्रिलियन होतं असताना, बँका आणि उद्योजकांच्या जोरावरच हे शक्य होणार आहे. आज भारताला जागतिक स्तरावर महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. डोंबिवली नागरी सहकारी बँकेची वाढ ही अत्यन्त शिस्तबद्धरित्या झाली आहे. बँकेने महिला उद्योजकांसाठी विशेष योजना राबविल्या पाहिजेत. एक स्त्री जेव्हा उद्योजक बनते, तेव्हा ती समाजातील अनेक घटकांना एकत्र आणते" त्यांच्या मनोगतात त्यांनी नवीन शाखेला शुभेच्छा देत, लवकरात लवकर बँकेची १०० वी शाखा सुरु व्हावी अशी आशा व्यक्त केली.
श्री सतीश मराठे यांनीही बँकेच्या नवीन शाखेसाठी शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. "सहकारी बँकानी इंटर्नल ऑडिटकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. योग्य इंटर्नल ऑडिट हा बँकांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो. देशातील सहकारी बँकानी गत आर्थिक वर्षात अत्यन्त समाधानकारक कामगिरी केली असून, देशाच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. सहकारी बँकानी डिजिटल टेक्नॉलॉजीकडे जायला हवे. डोंबिवली नागरी सहकारी बँकेची वाढ समाधाकारक असून, भविष्यात अधिकाधिक सेवा देण्यासाठी तयार राहावे अश्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेच्या उपाध्यक्षा सौ नंदिनी कुलकर्णी यांनी बँकेबाबत माहिती सांगितली. कार्यक्रमाला बँकेचे माननीय अध्यक्ष ऍड. श्री गणेश धारगळकर, माननीय संचालक श्री योगेश वाळुंजकर, माननीय संचालिका सौ पूर्वा पेंढरकर, बँकेचे सी इ ओ श्री रमेश सिंगही उपस्थित होते. बँकेचे क्लस्टर हेड श्री मुकेश गुप्ता यांनी बँकेच्या विविध योजनांची थोडक्यात माहिती दिली. आंबेगाव शाखा व्यवस्थापक श्री सुरज सौदे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले.