महिला म्हणून “ विशेष कौतुक ” होणार नाही, तीच खरी समानता – डॉ. इंदुमती जाखड

    
|

Indumati Jakhad
 
डोंबिवली - "समाजात स्री पुरुष असा भेदभाव कमी होत आहे. परंतु अजूनही समाजात "महिला आयुक्त" असल्याचे वेगळं कौतुक वाटतं, याचा अर्थ "जेंडर इक्वालिटी" साठी वेळ लागेल. जेव्हा महिला म्हणून विशेष कौतुक होणार नाही, तेव्हा खरी समानता आली असे समजावे’’ असे उद्गगार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या मा. आयुक्त व प्रशासक डॉ. इंदुराणी जाखड यांनी येथे काढले.
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेने राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त (तिथीप्रमाणे) त्यांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या मा. आयुक्त “ डॉक्टर इंदुराणी जाखड ” या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
 
कार्यक्रमादरम्यान मा. डॉ. इंदुराणी जाखड यांनी बँकेतील महिलांना मार्गदर्शन केले. ``आपल्या समाजात महिलेकडून खूप अपेक्षा असतात . महिलांनी प्रत्येक काम बिनचूक करावे अशी सर्वांची अपेक्षा असते, आणि त्यासाठी महिला नेहमीच प्रयत्नशील असतात. महिला सक्षमीकरणासाठी समाजातल्या सर्व स्तरावर काम झाले पाहिजे, त्यासाठी काम करणाऱ्या सर्व महिलांनी राजमाता जिजाऊ साहेबांचा आदर्श आपल्या अंगी बाणवून काम करत राहावं आणि आपल्या पुढच्या पिढीवर तसे संस्कार करावेत." असे मत त्यांनी व्यक्त केले. डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील कर्मचारी वर्गापैकी अर्ध्याहून अधिक कर्मचारी वर्ग, महिला असल्याचे समजल्यावर त्यांना अभिमान वाटला व त्याचे त्यांनी कौतुकही केले. कार्य्रक्रमाचे प्रास्ताविक मा. उपाध्यक्षा सौ.कुलकर्णी यांनी केले. मा. जाखड यांचा परिचय सौ. टोकरे यांनी करून दिला, आभारप्रदर्शन उपसरव्यवस्थापक सौ. पाटील यांनी केले तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सौ. सावंत यांनी केले. या कार्यक्रमास बँकेचे मा. अध्यक्ष श्री. धारगळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरव्यवस्थापक श्री. सिंग हे उपस्थित होते.