डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कुडाळ शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. डोंबिवली बँक कुडाळ शहरात गेली सुमारे 3 वर्षे कार्यरत आहे.
बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मा. संचालक सर्वश्री आरोलकर व शेलार यांनी मार्गदर्शन केले. सहा.सरव्यवस्थापक पेडणेकर यांनी बँकेच्या विविध योजनांचे सादरीकरण केले. मेळाव्यास चांगल्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.